अवचीत भेट होती, मृद्गंधापरी तुझी ती अलवार पावसाची मी वाट पाहिली होती निमिषार्ध दर्शनेंही, तडितेपरीच होती घन-घोर संगराची मज आस लाविती ती निःशब्द आठवेंही येती, इंद्रधनू साकारत जाती मनीं उन्हात पावसाचा खेळ मांडुनी जाती मज ओढ शरद् ऋतूची, अनिवार सत्य होती तव पाऊलीं चांदण्यांचे संसार नित्य फुलती
— श्री.उदय विनायक भिडे
Author
Post Views: 10