स्वागत नववर्षाचे

“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…



वर्षांमागुनि सरसर वर्षे सरती,
चिदानंदाचा अवचित ठेवा लाभला ।
अन्
नववर्षांचे नव-संजीवन देण्या साठी,
काळ उभा ठाकला ।

थबकुनि क्षणभर शांत चित्ते हळूच वदला
“तुमच्यापाशीं सर्वस्वचि असतां,
अर्थपूर्ण जगण्याचे सामर्थ्य
द्या तुम्हींच मजला ।

अर्थपूर्ण जगण्याचे सामर्थ्य
द्या तुम्हींच मजला ।।

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Author