काढा मत्सर, काढा हेवा हदयाला या पवित्र ठेवा

प्रदीप निफाडकरांची गझल



काढा मत्सर, काढा हेवा
हदयाला या पवित्र ठेवा

दिला तुला हदयाचा ठेवा
कितीजणींनी केला हेवा

आई,गुरू,मित्र,मुले,फुले
कुठेकुठे भेटतोस देवा?

अश्रुंनी तू पोट भरावे
गरिबांचा हाच सुकामेवा -हाच असे गरिबांचा मेवा

लिहितो गझला, लिहितो गाणी
सुरूच माझी समाजसेवा

ती दगडाची मूर्ती आहे -ती तर पाषाणाची मूर्ती
प्रदीपराजे आता जेवा

— प्रदीप निफाडकर

Author