जनटीका

घोड्यावरती बसू देईना, चालू देईना पायी
जगाची ही रीत बघा , कशी समजत नाही ..१,

सज्जनतेची वस्त्रे लेवूनी, निर्मळ जीवन आले
आपण बरे नी काम बरे, तत्व हे अंगीकारले...२,

मोठा झाला शिष्ठ समजोनी, वाळीत टाकीले मला
दुष्कृत्यामध्ये साथ हवी, त्यातील कांहीं व्यक्तीला...३,

जीवन जगणे कठीण होता, मार्ग तो बदलला
आगळी धडपड करून ती, यश मिळाले मला....४,

मिसळत होतो सर्वामध्ये, अतिशय प्रेमानी
तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द , माझ्याच कर्णांनी..५,

व्यक्ती तितक्या प्रकृती , ह्या समाजी
भिन्नतेचे स्वभाव विसरता, निराशा पदरी येते...६,

चित्ती येईल तसेच करावे, जागृत भाव ठेवून
इजा न होईल इतर जनाना, हे लक्षात घेवून...७

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



घोड्यावरती बसू देईना, चालू देईना पायी
जगाची ही रीत बघा , कशी समजत नाही ..१,

सज्जनतेची वस्त्रे लेवूनी, निर्मळ जीवन आले
आपण बरे नी काम बरे, तत्व हे अंगीकारले…२,

मोठा झाला शिष्ठ समजोनी, वाळीत टाकीले मला
दुष्कृत्यामध्ये साथ हवी, त्यातील कांहीं व्यक्तीला…३,

जीवन जगणे कठीण होता, मार्ग तो बदलला
आगळी धडपड करून ती, यश मिळाले मला….४,

मिसळत होतो सर्वामध्ये, अतिशय प्रेमानी
तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द , माझ्याच कर्णांनी..५,

व्यक्ती तितक्या प्रकृती , ह्या समाजी
भिन्नतेचे स्वभाव विसरता, निराशा पदरी येते…६,

चित्ती येईल तसेच करावे, जागृत भाव ठेवून
इजा न होईल इतर जनाना, हे लक्षात घेवून…७

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →