खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी,

ग्रहराशीच्या दशेवरती

तेच होई जीवनी तुमच्या,

जसे ग्रहमंडळ फिरती...१,

मित्र मंडळी सगे सोयरे,

शत्रू असोत वा प्रेमाचे,

जीवनातल्या हालचालीवरी,

परिणाम ते होई सर्वांचे...२,

हेच सर्व ते ग्रह असूनी,

सतत स्थान ते बदलती

परिस्थिती बघूनी तुमची,

वागण्यात तो फरक करती...३

अपयशाला कारणीभूत तो,

असतो कुणीतरी नजीकचा

राहू-केतू शनि वा मंगळ,

ग्रहमान बनतो त्या घडीचा...४,

यशाची चालता घौडदौड ती,

मदत लाभते काही जणांची

हे तर सारे इष्ट ग्रह ते,

फुलवी सुमने जीवनाची...५

-- डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



तुमचे जीवन अवलंबूनी,

ग्रहराशीच्या दशेवरती

तेच होई जीवनी तुमच्या,

जसे ग्रहमंडळ फिरती…१,

मित्र मंडळी सगे सोयरे,

शत्रू असोत वा प्रेमाचे,

जीवनातल्या हालचालीवरी,

परिणाम ते होई सर्वांचे…२,

हेच सर्व ते ग्रह असूनी,

सतत स्थान ते बदलती

परिस्थिती बघूनी तुमची,

वागण्यात तो फरक करती…३

अपयशाला कारणीभूत तो,

असतो कुणीतरी नजीकचा

राहू-केतू शनि वा मंगळ,

ग्रहमान बनतो त्या घडीचा…४,

यशाची चालता घौडदौड ती,

मदत लाभते काही जणांची

हे तर सारे इष्ट ग्रह ते,

फुलवी सुमने जीवनाची…५

— डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →