खांदा

 



बर झाल पहिली दिसली
नाहीतर विनाकारण तिच्यासारख्या दिसणारया
दुसरीच्या मागे धावत राहिलो असतो …

जिच्याशी माझा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नव्हता
तिच्यासाठी विनाकारण झुरत राहिलो असतो ….

आयुष्यातील बहुमोल वेळ विनाकारण|
उगाच वाया घालवीत राहिलो असतो …..

दुसरीला पाहून पहिलीला आठवत असतो
पहिली दिसताच दुसरीला विसरत असतो …..

दोघी एकत्र दिसल्याच तर
तिसरीचाच खांदा शोधत असतो ……..

कवी – निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →