तेजाब चित्रपट प्रदर्शित झाला

तेजाब’ मधून एन. चंद्रा यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली.



‘तेजाब’ या क्षण ॲक्शन रोमॅण्टिक चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने माधुरी दीक्षित यांना रातोरात स्टार केले होते. तर, ‘मि. इंडिया’ चित्रपटाने स्टार झालेल्या अनिल कपूर यांनी आणखी एका चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाची झलक सर्वांना दाखविली होती.

‘तेजाब’ मधून एन. चंद्रा यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली. या चित्रपटानं नव्वदच्या दशकात बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड केले होते.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीने संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील गाणी तेव्हा चांगलीच हिट झाली होती. माधुरी दीक्षित यांच्या ‘एक, दो, तीन’ या गाण्यावर तर आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ठेका धरला जातो. ‘सो गया ये जहाँ’ हे नितिन मुकेश यांच्या आवाजातील गाणे आजही अनेकांच्या ओठावर आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1