पैशांनी नव्हे तर नात्यांनी समृद्ध व्हा

जी नाती तयार झाली आहेत ती आपण जीवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे.



आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर एकशे तीस करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का झाली? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.

जी नाती तयार झाली आहेत ती आपण जीवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण शब्दांच्या नात्यात तसं नसतं. It’s mutual relation. मन जुळलं की आपलेपणाचे नातं होते. जे बंध खूप घट्ट असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्रांचे किंवा मैत्रिणींचे मी आहे ना हे शब्द संजीवनी सारखे काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं.
पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो. नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण.

मराठीसृष्टी टिम

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →