जेष्ठ मराठी अभिनेत्री शुभांगी जोशी

आपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या टीव्हीवरची लाडकी आजी म्हणुन प्रसिध्द होत्या.



ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचा जन्म ४ जुन १९४६ रोजी झाला.

आपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या टीव्हीवरची लाडकी आजी म्हणुन प्रसिध्द होत्या. छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री अशीही त्यांची ओळख होती.

आभाळमाया, काहे दिया परदेस या मालिकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.कलर्स वाहिनीवरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत त्यांनी जिजीची भूमिका केली होती.

त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती.

५ सप्टेंबर २०१८ रोजी शुभांगी जोशी यांचे निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author