कवी मनोहर ओक

‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह ‘अंतर्वेधी’ (१९७९) आणि ‘चरसी’ या दोन कादंबऱ्या’ प्रकाशित झाल्या आहेत. ओक यांच्या निधनानंतर त्यानंतर ३ वर्षांनी ज्येष्ठ कवी व समीक्षक चंद्रकांत पाटील आणि तुळसी परब यांनी ओक यांच्या कवितांचे संपादन करून ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ हा संग्रह तयार केला.



कवी मनोहर ओक यांचा जन्म २७ मे १९३३ रोजी मुंबई येथे झाला.

‘मन्या ओक’ या नावाने अधिक परिचित असणारे मनोहर ओक हे त्यांच्या हयातीतच जणू एक दंतकथा झाले होते. चौकटीपल्याडचे अनुभव मांडू पाहणारी, नेणिवेतील संवेदनांना भिडणारी अशी कविता त्यांनी लिहिल्या.मनोहर ओक यांचे शालेय शिक्षण एस.एस.सी.पर्यंत झाले होते. ते अनियतकालिकांच्या चळवळीतील प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध होते. मनोहर ओक यांनी आयुष्यात कधीही तडजोडी केल्या नाहीत. बंधने मानली नाहीत. नातीगोती, घरसंसार अशा कसल्याही बंधनात स्वत:ला गुरफटून घेतले नाही. कवितेतच जगणे थाटणाऱ्या या कलंदर कवीने प्रस्थापित कवितेचा चेहरामोहराही बुद्धीपुरस्सर टाळला आणि आपल्याच अटींवर कविता लिहिल्या. मुंबई महानगरीत जगण्याचा सर्वस्पर्शी अनुभव मनोहर ओकांच्या साहित्यातून व्यक्त होतो. त्यांनी समकालीन वास्तवाचा वेध आधुनिक संवेदनशीलतेने घेतला आहे. एकाकीपण, नैराश्य, उदासीनता, आयुष्याची निरर्थकता ही त्यांच्या कवितेची मुख्य आशयसूत्रे असून कवितेची शैली अनियंत्रित वाटली, तरी तिचा आशय धारदारपणे संक्रमित करणारी आहे. प्रतिमासृष्टीही समृद्ध आहे. ‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह ‘अंतर्वेधी’ (१९७९) आणि ‘चरसी’ या दोन कादंबऱ्या’ प्रकाशित झाल्या आहेत. ओक यांच्या निधनानंतर त्यानंतर ३ वर्षांनी ज्येष्ठ कवी व समीक्षक चंद्रकांत पाटील आणि तुळसी परब यांनी ओक यांच्या कवितांचे संपादन करून ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ हा संग्रह तयार केला. त्याची पहिली आवृत्ती १९९६ साली, तर दुसरी आवृत्ती १९९९ साली लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित के ली. त्यानंतर २१ वर्षांनी पुन्हा एकदा ओक यांच्या कवितांची समाजमाध्यमांवर चाललेली विस्कळीत आणि धावती चर्चा पाहता तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय लोकवाङ्मय गृहाने घेतला.

मनोहर ओक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.

— प्रा. मंगला गोखले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →