कवयित्री आणि लेखिका सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो

त्यांचं बालसाहित्य, लोकसाहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे. २०१६ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा अनेक मान्यवरांच्या नावाचे आणि नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.



कवयित्री आणि लेखिका सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो यांचा जन्म २३ एप्रिल १९५६ रोजी झाला.

सिसिलिया कार्व्हालो या कवयित्री आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचं बालसाहित्य, लोकसाहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे. २०१६ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा अनेक मान्यवरांच्या नावाचे आणि नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

आयदान : सांस्कृतिक ठेवा, धागा, माणूस उकरून काढावा लागतोय…, दारातल्या रांगोळीचे रंग, मातीची हाक, मोगऱ्याचा मांडव, पालखी, ऋतुचक्र, सूर्य किरणात आला, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →