अभिनेत्री सई देवधर

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केलीय. ‘लपंडाव ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता.



अभिनेत्री सई देवधर यांचा जन्म २१ एप्रिल १९८२ रोजी झाला.

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केलीय. ‘लपंडाव ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. ज्येष्ठ कॅमेरामन देबू देवधर हे सई देवधरचे पिता होत. दिग्दर्शिका श्रावणी देवधर या आई होत. ‘मोगरा फुलला ‘ या चित्रपटातून सई देवधर ने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केले आहे.

सई देवधरने ‘सायलेंट-टाईज’ या नावाची शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे. यात रेणुका शहाणे प्रमुख भूमिका केली आहे. एलजीबीटी विषयी समाजाला आणि समाजातील लोकांना जागरुक करणे हा या शॉर्ट फिल्मचा हेतू आहे. या आधी झी 5 वरील ‘डेट’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सई देवधरने केले होते.

सई देवधरने शक्ती आनंद यांच्याशी लग्न केले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →