चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते बाबूराव पेंढारकर

१९२० साली बाबूराव पेंढारकर यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा जन्म २२ जून १८९६ रोजी झाला.

मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. रंगभुमीवरील ’झुंजारराव’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली. बाबूरावांच्या जीवनावर "बाबूराव नावाचे झुंबर-बाबूराव पेंढारकर" हा श्रीकांत पेंढारकरांनी संपादित केलेला ग्रंथ मुंबईच्या मोरया प्रकाशनाने १९९० मध्ये प्रसिद्ध केला आहे.

बाबूराव पेंढारकर यांचे ९ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

१९२० साली बाबूराव पेंढारकर यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा जन्म २२ जून १८९६ रोजी झाला.

मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. रंगभुमीवरील ’झुंजारराव’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली. बाबूरावांच्या जीवनावर “बाबूराव नावाचे झुंबर-बाबूराव पेंढारकर” हा श्रीकांत पेंढारकरांनी संपादित केलेला ग्रंथ मुंबईच्या मोरया प्रकाशनाने १९९० मध्ये प्रसिद्ध केला आहे.

बाबूराव पेंढारकर यांचे ९ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Author