पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर

अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला.



आज २५ ऑक्टोबर.. आज प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांची पुण्यतिथी.

त्यांचा जन्म १८ मे १९२१ रोजी झाला. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर ह्यांचे ते चिरंजीव होत.

विनायकराव पटवर्धन हे पलुसकरांचे गायन गुरू होत. अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द. वि. पलुसकर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती.

दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुसकरांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.

पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुस्कर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. पलुसकर यांच्या जीवनावर लघुपट पण अंजली कीर्तने यांनी काढला आहे.

दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचे २५ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया

Author

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →