बॉलिवूडची नायिका सिमी गरेवाल

आज १६ आक्टोबर.. आज सिमी गरेवाल यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ आक्टोबर १९४७ रोजी झाला.

मा.सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच.

सिमी गरेवाल यांचे लहानपण इंग्लड मध्ये गेले. वयाच्या १५ व्या वर्षी फिरोज खान यांच्या चित्रपटात काम केले. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले. मा.सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. त्यांनी ‘मेरा नाम जोकर’, ‘कर्ज’, सिद्धार्थ या काही चित्रपटात दिलेले बोल्ड सीनआठवत असतीलच. सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटातील शशी कपूर आणि त्यांचं चुंबन दृश्यही हमखास आठवतं. पण ते अत्यंत कलात्मकरीत्या चित्रित केलं गेलं होतं. तरीही त्यावरून त्या वेळी गोंधळ झाला होता. सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. मा.सिमी गरेवाल यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३



आज १६ आक्टोबर.. आज सिमी गरेवाल यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ आक्टोबर १९४७ रोजी झाला.

मा.सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच.

सिमी गरेवाल यांचे लहानपण इंग्लड मध्ये गेले. वयाच्या १५ व्या वर्षी फिरोज खान यांच्या चित्रपटात काम केले. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले. मा.सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. त्यांनी ‘मेरा नाम जोकर’, ‘कर्ज’, सिद्धार्थ या काही चित्रपटात दिलेले बोल्ड सीनआठवत असतीलच. सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटातील शशी कपूर आणि त्यांचं चुंबन दृश्यही हमखास आठवतं. पण ते अत्यंत कलात्मकरीत्या चित्रित केलं गेलं होतं. तरीही त्यावरून त्या वेळी गोंधळ झाला होता. सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman’s World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. मा.सिमी गरेवाल यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1