आयुष्यातलं पहिलंवहिलं क्रेडिट कार्ड घेऊन तो घरी आला.
कौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं.
थोड्या वेळानं म्हणाली, “पोहे करतेय. आठ आण्याची कोथिंबीर घेऊन या.”
“आणतो, पण सुटे नाहियेत, तेवढे दे.”
“आणा क्रेडिट कार्डावर!”.
“?”
संजीव गोखले,
०३ जून २०२२.
Author
Post Views: 17