ओळखा पाहू – होळीमय चारोळ्या

आोळखा पाहू हे कोण? हे तर भारताच्या राजकारणातले गुरु !!



(१)

गुरूलाच दाखविला

धोबीपछाड तयाने

घालूनी टोपी गुरुची

युद्धात उतरला सत्यवीर(?)

(२)

जनसमुद्र दिसत होता

डोळ्यांसमोर तयाचा

की नजर अधू जाहली

की कबूतरे उडुनी गेली

(३)

भीष्मासम वृद्ध

हा सेनापती महान

एक पदाती सम आज

का उतरला रणांगणात?

(४)

आधी लगीन गादीशी

मग राजकन्येशी

विच्छा त्याची आज

पूर्ण होणार का?

(५)

द्वारकेचा राजा

होणार का दिलीश्वर

की कुणा अर्जुनाचा

सारथीच ठरणार?

— विवेक पटाईत

Author