पुण्यामधलंच स्थळ हवं ।
मुंबईला सेकंड ऑप्शन ।
लिकर पी कर विकएन्ड ।
लाईफसाठी हीच कॅप्शन ।।
शनवारवाडा , वैशाली हे ।
आऊटडेटेड झाले पॉईंट्स ।
गोल ऍचिव्ह करण्यासाठी ।
शोधते मी नव्या हाईट्स ।।
मल्टिप्लेक्स , मॉल मध्ये ।
टाईमपास भारी होतो ।
सिंहगड पर्वतीवर ।
आता कोण जातो येतो ?
फेबु ट्विटर मेसेंजरवर ।
अपडेट्सचा धूर अन् जाळ ।
मेमरी होते फुल तरीही ।
नेटवरचा येतोच गाळ ।।
जेवण घरचं बेचव सालं ।
हवा यार पिझ्झा बर्गर ।
पब क्लब डान्सफ्लोअर ।
सच तो है ये हुक्का पार्लर ।।
बाईकवरची नशाच न्यारी ।
गच्च धरावं बॉयफ्रेंडला ।
तोंडावरती स्कार्फ बांधून ।
थेट घुसावं लॉंग ड्राइव्हला ।।
चॅटिंग डेटिंग करण्यासाठी ।
फार्म हाऊस पॅकेजवाली ।
ब्रेकअप , पॅचअप इव्हेंट्ससाठी ।
तिथेच होते पार्टी ओली ।।
ऑनलाइन मिटिंगमधल्या ।
पोझिशन्स अँड कमिटमेंट्स ।
एमबीए चं येडं पकवतं ।
रिझल्ट्स, मॉरल , एटिकेट्स ।।
स्थळाला दे होकार बये ।
आई रडते रोज घरी ।
‘ वय वाढतं ‘ बोअर करते ।
पॅनिक होते घरीदारी ।।
नकोच मुलं , नकोच नाती ।
डस्टबीन्स तर नकोच घरी ।
ऑकेजनली ड्रग्ज साठी ।
लिव्ह इन चा ऑप्शन भारी ।।
चौकट नको , स्पेस हवी ।
त्यासाठीच तर धावाधाव ।
माझं पॅकेज , माझं शहर ।
मीच ठरविन , माझी हाव ।।
* * * *
पस्तिसाव्या वाढदिवशी ।
कुणी नाही विश केलं ।
अजून तिला कळलं नाही ।
क्षितीज किती दूर गेलं ।।
अजून तिला वाटत राहतं ।
पुण्यामधलंच स्थळ हवं ।
आरसा हसतो हळूच गाली ।
तिला नसतं भान नवं ।।
– डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी