निसर्ग हा हिरवळलेला
पुण्यस्रोत शुभ्र जलाचा….
दरीदरीतुनी झेपावतो
उंच धबधबा डोंगरीचा….
निळ्यानिळ्या अंबरी
धुसर पांघर धुक्याचा….
रंग कोवळे सप्तरंगले
धुंद सुगंध मृदगंधाचा….
सांजाळल्या सांजवेळी
पापणीत भास तृप्तीचा….
समोर वाहते कृष्णामाई
साक्षात्कार जणू गंगौघाचा….
रचना क्र. ९२
३१/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Author
Post Views: 10