मनराधा

मनराधेने जवळी बसावे
कर हे धरुनी जीवा पुसावे...

असते असले भाग्य कुणाचे
मम भाळी ते उमलुनी यावे...

स्पर्श मयुरी प्रीत रुजवीतो
रुजता प्रीती जीवन फुलावे...

बकुळीचा गंध गंधाळता
हुंगता हुंगता भुलुनी जावे...

जीवनी, सत्यप्रीत निरंतर
दिगंतरी त्या प्रीतीत जगावे..

अद्भुत अंतरंगी सावळबाधा
मनराधेने त्या रंगात नहावे..

रचना क्र. ७२
१४/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908



मनराधेने जवळी बसावे
कर हे धरुनी जीवा पुसावे…

असते असले भाग्य कुणाचे
मम भाळी ते उमलुनी यावे…

स्पर्श मयुरी प्रीत रुजवीतो
रुजता प्रीती जीवन फुलावे…

बकुळीचा गंध गंधाळता
हुंगता हुंगता भुलुनी जावे…

जीवनी, सत्यप्रीत निरंतर
दिगंतरी त्या प्रीतीत जगावे..

अद्भुत अंतरंगी सावळबाधा
मनराधेने त्या रंगात नहावे..

रचना क्र. ७२
१४/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908

Author