जगरहाटी

आता शब्दमनभावनांना आवरावे
टाळावीत मुक्त, मोकळी वक्तव्ये....

दुखावतात मने सहज बोलताना
नित्य शब्दमनभावनांना सावरावे....

कुणी कसेही बेमुर्वत इथे वागावे
आपण फक्त मौन गिळूनी रहावे....

प्रेम जिव्हाळ्याची नाती रुक्ष आता
सहृदयी भावनाच संपली समजावे....

मानमर्यादा, ज्येष्ठत्वही इथे संपले
बोलणाऱ्याने आता हवे ते बोलावे....

हीच कलियुगाची सत्य जगरहाटी
आपणच समजून उमजून चालावे....

रचना क्र. 13

5/5/2023

-वि ग.सातपुते (भावकवी)

9766544908



आता शब्दमनभावनांना आवरावे
टाळावीत मुक्त, मोकळी वक्तव्ये….

दुखावतात मने सहज बोलताना
नित्य शब्दमनभावनांना सावरावे….

कुणी कसेही बेमुर्वत इथे वागावे
आपण फक्त मौन गिळूनी रहावे….

प्रेम जिव्हाळ्याची नाती रुक्ष आता
सहृदयी भावनाच संपली समजावे….

मानमर्यादा, ज्येष्ठत्वही इथे संपले
बोलणाऱ्याने आता हवे ते बोलावे….

हीच कलियुगाची सत्य जगरहाटी
आपणच समजून उमजून चालावे….

रचना क्र. 13

5/5/2023

-वि ग.सातपुते (भावकवी)

9766544908

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →