अव्यक्त गूढ

न बोलताच ती निघुनी गेली
मी उमजायचे उमजूनी गेलो

कळलेच नाही तीचे वागणे
आठवणीत मी जगत राहिलो

घडायचे ते ते घडुनी गेले
मौनाचा अर्थ मी लावित गेलो

तिच्याच लोचनी भाव नि:शब्दी
मी उमजायचे उमजूनी गेलो

पराधीनता हा शाप जीवनी
व्यर्थ जगणे जगी जगत राहिलो

आज अव्यक्ताचे गूढ उकलले
हेच समाधान मानित राहिलो
*********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908)

रचना क्र. ३०६

२६/११/२०२२



न बोलताच ती निघुनी गेली
मी उमजायचे उमजूनी गेलो

कळलेच नाही तीचे वागणे
आठवणीत मी जगत राहिलो

घडायचे ते ते घडुनी गेले
मौनाचा अर्थ मी लावित गेलो

तिच्याच लोचनी भाव नि:शब्दी
मी उमजायचे उमजूनी गेलो

पराधीनता हा शाप जीवनी
व्यर्थ जगणे जगी जगत राहिलो

आज अव्यक्ताचे गूढ उकलले
हेच समाधान मानित राहिलो
*********
— वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908)

रचना क्र. ३०६

२६/११/२०२२

Author