तुझे हास्य मधुरम लाघवी
शमविते या विरह वेदनांना
मी आजही जगतोच आहे
आठवित तुझ्या आठवांना
झुळझुळती शब्द अबोली
जागवीती अंतरी भावनांना
उमलुनी येते एकेक कविता
शमविते अंतरीच्या वेदनांना
शब्दा शब्दात तुझे प्रसवणे
जाणवते अक्षरात गुंफताना
उमजतो मौन मी अंतरातले
आठवीत तुझ्याच आठवांना
********
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०२
२३/११/२०२२
Author
Post Views: 12