दिंडीत वैष्णवांच्या
धावघावती पाऊले
या लोचनी एकची
परब्रह्म उभे सावळे…
नादात टाळमृदंगाच्या
सारे विठ्ठलनामी रंगले
तनमन विठ्ठल विठ्ठल
सारे वाळवंटी रमलेले…
शुन्यात सत्य ब्रह्मरूप
विटेवरी रुपडे सावळे
राऊळ, गाभारी त्राता
अंत:पुर! उद्धारलेले…
देवा नको रे येणेजाणे
मन तुझ्यात रे तृप्तले
संतत्वात तुझीच साक्ष
ब्रह्मानंदी आत्म दंगलेले…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.३०१
२२/११/२०२२
Author
Post Views: 16