अंतरी स्नेहलभाव असावा
मनी नसावी असुया कटुता
निर्मल मैत्रसहवास घडावा
भक्ती प्रीतीचा छंद जडावा….
संस्कारी अमृतात भिजावे
हॄदयी सत्यप्रकाश पडावा
संतत्वाच्या जळात डूंबता
जीवनाचा सत्यार्थ कळावा….
जन्म मानवी संचित युगांचे
सत्कर्मी सदा जगत रहावा
चैतन्याचा आत्माच हरिहर
ध्यास जीवा त्याचा असावा….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२८९
७ /११ /२०२२
Author
Post Views: 14