झुळझुळ

विरहात जरी कासाविस जीव
हॄदयातुनी , पाझरते भावप्रीत

अजुनही मन तुझ्यात गुंतलेले
स्मरणगंधला गंधाळ स्पंदनात

गुलमुसलेली ती सांज क्षितिजी
जणु रंगली तुझ्याच प्रतिबिंबात

मनांगणी दरवळते तीच बकुळी
मंत्रमुग्धली माझ्या भावशब्दात

दुःख वेदनांचे सावट जरी अंतरी
तरतो तव अस्तित्वाच्या खुणात

तुझ्याच रुपात जगविते कविता
प्रीतभावनांची झुळझुळ अंतरात.

-- वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र.२६२

१६/१०/२०२२



विरहात जरी कासाविस जीव
हॄदयातुनी , पाझरते भावप्रीत

अजुनही मन तुझ्यात गुंतलेले
स्मरणगंधला गंधाळ स्पंदनात

गुलमुसलेली ती सांज क्षितिजी
जणु रंगली तुझ्याच प्रतिबिंबात

मनांगणी दरवळते तीच बकुळी
मंत्रमुग्धली माझ्या भावशब्दात

दुःख वेदनांचे सावट जरी अंतरी
तरतो तव अस्तित्वाच्या खुणात

तुझ्याच रुपात जगविते कविता
प्रीतभावनांची झुळझुळ अंतरात.

— वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र.२६२

१६/१०/२०२२

Author