भिज नां पाऊसात

भिज नां जराशी नखशिखांत
मना नाहूदे चिंबचिंब पाऊसात...

हा ऋतुच बहरलेल्या प्रीतीचा
ओलेती ये भावनांच्या मिठित...

निर्मळ स्पर्शात चैतन्य आगळे
ब्रह्मानंदाची, साक्ष त्या सुखात...

निसर्गाचे, अविष्कार पांघरावे
भिजुनी रिमझिमल्या सरिसरित...

ही कोजागिरी, चंद्र चांदण्यांची
कोजागर, कोजागर मनांमनात...

-- वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. २५३

९/१०/२०२२



भिज नां जराशी नखशिखांत
मना नाहूदे चिंबचिंब पाऊसात…

हा ऋतुच बहरलेल्या प्रीतीचा
ओलेती ये भावनांच्या मिठित…

निर्मळ स्पर्शात चैतन्य आगळे
ब्रह्मानंदाची, साक्ष त्या सुखात…

निसर्गाचे, अविष्कार पांघरावे
भिजुनी रिमझिमल्या सरिसरित…

ही कोजागिरी, चंद्र चांदण्यांची
कोजागर, कोजागर मनांमनात…

— वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. २५३

९/१०/२०२२

Author