वैभव शब्दांचे

मी मनामना जोडित राहिलो..
मी माणसा माणसात राहिलो...

नाही कधीच क्षणभर थांबलो
नाही कुणास बोचलो टोचलो...

जग सारे मायबाप बंधुभगिनी
समजुनी जगती जगत राहिलो...

काय मिळविले, काय हरविले
या विचारात न मी कधी गुंतलो...

देणे घेणे हिशेब सारे संचिताचे
असे समजुनी समाधानी राहिलो...

वैभव! शाब्दिक प्रेमभावनांचे
मीच सदोदित मिरवित राहिलो...

तळहातांच्या ठळक रेषामधुनी
मीच मन:शांती शोधित राहिलो...

-- वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. २३८

१७ /९/२०२२



मी मनामना जोडित राहिलो..
मी माणसा माणसात राहिलो…

नाही कधीच क्षणभर थांबलो
नाही कुणास बोचलो टोचलो…

जग सारे मायबाप बंधुभगिनी
समजुनी जगती जगत राहिलो…

काय मिळविले, काय हरविले
या विचारात न मी कधी गुंतलो…

देणे घेणे हिशेब सारे संचिताचे
असे समजुनी समाधानी राहिलो…

वैभव! शाब्दिक प्रेमभावनांचे
मीच सदोदित मिरवित राहिलो…

तळहातांच्या ठळक रेषामधुनी
मीच मन:शांती शोधित राहिलो…

— वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. २३८

१७ /९/२०२२

Author