आत्माराम

आत्माराम, पांडुरंग माझा
अंतरीचाच विश्राम माझा...।।धृ।।

चालतो सदासदा सांगाती
सदासर्वदा देई सन्मति
जागवितो तो राम अंतरी
कृपाळू आत्माराम माझा...१

जग, व्यवहारी तो रमतो
सत्कर्मी, चाल चालतो
निष्कलंक सत्य दावितो
निर्विकार परमात्मा माझा...२

जन्मुनीही मरण जीवाला
व्यालेले हेच सत्य सृष्टिला
भक्तीप्रीती गंध दरवळावा
सांगतो आत्माराम माझा...३

सत्यात सदा नांदते शांती
असत्यात, अंती अशांती
याचीतो आता आत्मशांती
भजण्या आत्माराम माझा...४

-- वि..सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. २३१

११/९/२०२२



आत्माराम, पांडुरंग माझा
अंतरीचाच विश्राम माझा…।।धृ।।

चालतो सदासदा सांगाती
सदासर्वदा देई सन्मति
जागवितो तो राम अंतरी
कृपाळू आत्माराम माझा…१

जग, व्यवहारी तो रमतो
सत्कर्मी, चाल चालतो
निष्कलंक सत्य दावितो
निर्विकार परमात्मा माझा…२

जन्मुनीही मरण जीवाला
व्यालेले हेच सत्य सृष्टिला
भक्तीप्रीती गंध दरवळावा
सांगतो आत्माराम माझा…३

सत्यात सदा नांदते शांती
असत्यात, अंती अशांती
याचीतो आता आत्मशांती
भजण्या आत्माराम माझा…४

वि..सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. २३१

११/९/२०२२

Author