तुला पाहता
मी मज हरवुनी जाते
विसरुनी सारे,
तुझ्या रुपात रंगते…
अंतरी, वेड प्रीतीचे
लडिवाळ लाघवी
तुला आठविता,
सारे भुलुनी जाते…
स्पर्शात तुझ्या
ते स्वर्गसुख आगळे
निर्मलतेच्या भवसागरी
मी अविरत डुंबते…
क्षणक्षण भावप्रीतीचे
अधीर आसुसलेले
अथांग प्रीतसागरी
मी तृप्त सचैल नाहते…
–वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२१५
२४/८/२०२
Author
Post Views: 11