ध्यास

मज नाही अजुनही कळले
नाते, तुझे नी माझे कसले...
परी नित्य ध्यास तुझा अंतरी
हेच सत्य, निरागस मनातले...

श्वासा श्वासात तूच सांगाती
सावलीत रूप तुझे सांडलेले...
बैचन करते हे गूढ अनामिक
सांगु कुणास, मी हे मनातले...

तुही अशीच निःशब्द अबोली
मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले...
तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां
सहजी सांगुनी जाती मनातले...

पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे
जन्मी, ऋणानुबंधी लाभलेले...
जे आहे,जे घडले ईछ्या त्याची
ते सुख, मी ओंजळीत झेललेले...

–वि.ग.सातपुते.( भावकवी )

9766544908

रचना क्र.२०६

१८/८/२०२२



मज नाही अजुनही कळले
नाते, तुझे नी माझे कसले…
परी नित्य ध्यास तुझा अंतरी
हेच सत्य, निरागस मनातले…

श्वासा श्वासात तूच सांगाती
सावलीत रूप तुझे सांडलेले…
बैचन करते हे गूढ अनामिक
सांगु कुणास, मी हे मनातले…

तुही अशीच निःशब्द अबोली
मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले…
तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां
सहजी सांगुनी जाती मनातले…

पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे
जन्मी, ऋणानुबंधी लाभलेले…
जे आहे,जे घडले ईछ्या त्याची
ते सुख, मी ओंजळीत झेललेले…

–वि.ग.सातपुते.( भावकवी )

9766544908

रचना क्र.२०६

१८/८/२०२२

Author