जीवन हा श्वास आहे
स्मरणगंधी ध्यास आहे…
कळीकळीने उमलावे
फुलांनी दरवळणे आहे…
सभोवारी गंधाळावे
सत्कर्मी आव्हान आहे…
सुखदुःखांच्या सरोवरी
मुक्त असे डुंबणे आहे…
प्रवाहा विरुद्ध पोहणे
पुरुषार्थाची कमाल आहे…
विवेकाची साथ असावी
अप्राप्यही, प्राप्त आहे…
मनामनांत नित्य रहावे
तीच खरी मन:शांती आहे…
द्वैत, अद्वैत एकरूपता
निर्मलतेचे प्रतिबिंब आहे…
कानी मंजुळ धुन मुरलीची
आत्मानंदी सुंदर सत्य आहे…
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८८
५/८/२०२२
Author
Post Views: 16