खरेखुरे समाधान

मी, मीच एक, सारेच माझे
मीच आहे म्हणुनी सारे आहे

मी सर्वज्ञ,सारेच मला कळते
मीच फक्त जगी प्रज्ञावंत आहे

हाच अहंभाव कशाला फुका
जिथे मीत्व ते सारे व्यर्थ आहे

चौदा चौकडयाचेही राज्य गेले
उमज मनी, तूच रे कोण आहे

सोडूनी द्यावे, मनीचे हेवे दावे
त्यातची खरेखुरे समाधन आहे

वाचे नम्रत्वे वदुनी जगी जगावे
कृतज्ञता! जगतीच श्रेष्ठ आहे

जपावीत मने सर्वांचीच संसारी
हाच मोक्षानंदाचा मूलमंत्र आहे

-- वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ९४.

२६ - ३ - २०२२.



मी, मीच एक, सारेच माझे
मीच आहे म्हणुनी सारे आहे

मी सर्वज्ञ,सारेच मला कळते
मीच फक्त जगी प्रज्ञावंत आहे

हाच अहंभाव कशाला फुका
जिथे मीत्व ते सारे व्यर्थ आहे

चौदा चौकडयाचेही राज्य गेले
उमज मनी, तूच रे कोण आहे

सोडूनी द्यावे, मनीचे हेवे दावे
त्यातची खरेखुरे समाधन आहे

वाचे नम्रत्वे वदुनी जगी जगावे
कृतज्ञता! जगतीच श्रेष्ठ आहे

जपावीत मने सर्वांचीच संसारी
हाच मोक्षानंदाचा मूलमंत्र आहे

— वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ९४.

२६ – ३ – २०२२.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →