नभ प्रीतीचे

नभ तव स्मृतींचे, ओघळते लोचनी
वाटते तुझ्या प्रीतीत विरघळूनी जावे

ठोके स्पंदनाचे दंग तुझ्याच आठवात
सभोवार दूजे काय आहे मला न ठावे

मनमंदिराच्या गाभारी तुझीच गे मूर्ती
निरंजनी दीपणारे तव रूप मज भावे

अजूनही अंतरी निनादते राऊळ घंटा
तुझी, पाऊल प्रदक्षिणा श्रद्धा जागवे

जणू तूच राधा मीरा भक्तीत दंगलेली
निरागस त्या भक्तीरुपात हरवूनी जावे

कशा, किती? व्यक्त करू मी भावनां
वाटते, मंगल नभप्रीतीचे मिठीत घ्यावे

-- वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ५३

२० - २ - २०२२.



नभ तव स्मृतींचे, ओघळते लोचनी
वाटते तुझ्या प्रीतीत विरघळूनी जावे

ठोके स्पंदनाचे दंग तुझ्याच आठवात
सभोवार दूजे काय आहे मला न ठावे

मनमंदिराच्या गाभारी तुझीच गे मूर्ती
निरंजनी दीपणारे तव रूप मज भावे

अजूनही अंतरी निनादते राऊळ घंटा
तुझी, पाऊल प्रदक्षिणा श्रद्धा जागवे

जणू तूच राधा मीरा भक्तीत दंगलेली
निरागस त्या भक्तीरुपात हरवूनी जावे

कशा, किती? व्यक्त करू मी भावनां
वाटते, मंगल नभप्रीतीचे मिठीत घ्यावे

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ५३

२० – २ – २०२२.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →