गुलमुसलेल्या नभाळी
प्रतीक्षेत ही सांजवेळा
नेत्री, तुझे रूप लाघवी
श्वास! हा खोळंबलेला
बेभान तो पवन धुंदला
गंधता,दरवळ प्राजक्ती
मनमोर हा नाचनाचला
भाळुनी तव सौन्दर्याला
या क्षणी जवळी असावे
भावशब्द, तुझे अंतरीचे
प्रीतीत माळता, माळता
कवेत घ्यावे, प्रीतनभाला
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २१.
२१- १ – २०२१.
Author
Post Views: 12