साक्ष भगवंती

सुरम्य सप्तरंगलेले जीवन
फुले, पाने, काटेही संगती
शब्दभावनां! वैखरीवरती
कृपाच! आगळी भगवंती

सुखदुःख,वेदनांचे मोहोळ
भावनांतुनी गुंतलेली प्रीती
सत्य! हेची मर्म जीवनाचे
हृद्य वास्तव, सदैव सांगाती

मनाचा कोंडमारा जीवघेणा
घुसमट मौनी, छळे एकांती
भळभळणाऱ्या, दग्ध वेदनां
तरीही सोबती सांत्वनी प्रीती

प्रवास श्वासांचा, थांबा मृत्यू
कालचक्राचा अदृश्य चालक
ललाटीचे अलिखित भाकीत
साक्ष! हीच कृपाळु भगवंती

-- वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. १०.

१० - १ - २०२२.



सुरम्य सप्तरंगलेले जीवन
फुले, पाने, काटेही संगती
शब्दभावनां! वैखरीवरती
कृपाच! आगळी भगवंती

सुखदुःख,वेदनांचे मोहोळ
भावनांतुनी गुंतलेली प्रीती
सत्य! हेची मर्म जीवनाचे
हृद्य वास्तव, सदैव सांगाती

मनाचा कोंडमारा जीवघेणा
घुसमट मौनी, छळे एकांती
भळभळणाऱ्या, दग्ध वेदनां
तरीही सोबती सांत्वनी प्रीती

प्रवास श्वासांचा, थांबा मृत्यू
कालचक्राचा अदृश्य चालक
ललाटीचे अलिखित भाकीत
साक्ष! हीच कृपाळु भगवंती

— वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. १०.

१० – १ – २०२२.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →