कृपा दयाघनाची

आत्मारामा , सर्वेश्वरा , दयाघना
देवा ! मंगलम चरण तुझे नमितो
सदैव स्मरणात तुझ्या मी जगतो
देवा ! मंगलम चरण तुझे वंदितो।।१।।

शिशु , शैशव , वात्सल्य स्मरता
वृध्दत्वे ! आज मी सुखात रमतो
दैवे , प्रारब्ध्ये सुखदुःखां संगती
तव कृपेच्या अमृतसागरी डुंबतो।।२।।

क्षणक्षण सारे , सर्वेश्वराची कृपा
मीच भक्त भोळा , अज्ञानी पामर
तुझ्याच कृपाकटाक्षे मी उद्धरुनी
भावभक्तीने गीतास मी गुंफितो।।३।।

-- वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. २

२ - २ - २०२२.



आत्मारामा , सर्वेश्वरा , दयाघना
देवा ! मंगलम चरण तुझे नमितो
सदैव स्मरणात तुझ्या मी जगतो
देवा ! मंगलम चरण तुझे वंदितो।।१।।

शिशु , शैशव , वात्सल्य स्मरता
वृध्दत्वे ! आज मी सुखात रमतो
दैवे , प्रारब्ध्ये सुखदुःखां संगती
तव कृपेच्या अमृतसागरी डुंबतो।।२।।

क्षणक्षण सारे , सर्वेश्वराची कृपा
मीच भक्त भोळा , अज्ञानी पामर
तुझ्याच कृपाकटाक्षे मी उद्धरुनी
भावभक्तीने गीतास मी गुंफितो।।३।।

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. २

२ – २ – २०२२.

Author