क्षण भाळीचे

अस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा



अस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा
लोचनी, नभांगण गतस्मृतींचे

जगणे ! याचेच सुंदर नाव असे
सांगा ? काय कसे विसरायचे

मना मनांचे, जगी नाते अनोखे
विधिलिखित सारे क्षण भाळीचे

आसक्त ! निर्मळ पदर भावनांचे
स्पर्श ! मनांतरी भावुक स्पंदनांचे

होवुनी आत्ममुख जाणावे सत्य
लाभलेले प्रांजळ भोग प्राक्तनाचे

सत्कर्माची नित्यची कांस धरूनी
स्मरावे स्वर, मंजुळ मुरलीधराचे

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. १२६

२९ – ९ – २०२१.

Author