मैत्रसुखदा

मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते



मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते
क्षणांक्षणाला आधार जीवनी

मनामनांचे ते अदभुत मिलन
मैत्री सावरणारा हात जीवनी

श्रीमंत गरिबीची नसे तुलना
निस्वार्थी! गळाभेट जीवनी

नाते सर्वस्वाच्या पलीकडचे
मैत्रीत, न दुजाभाव जीवनी

निर्व्याज लोभस मैत्र लाभणे
भाग्यवंत! तोच याच जीवनी

सर्व नात्यात,मैत्रभाव असावा
हीच सत्य सुखदा असे जीवनी

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र.११९.

१२ – ९ – २०२१.

Author