आभाळ प्रीतभारले

अलवार छेडित छेडित आठवांना



अलवार छेडित छेडित आठवांना
पवनधुंदला येतो उधळत उधळत

भरुनी येते, आभाळ प्रीतभारले
मयूरपिसारा फुलवित, फुलवित

भावप्रितीचा गुलमोहोर आगळा
दरवळतो गंध कस्तुरी मनामनात

क्षणक्षण भाग्यवंती दान दयाघनी
पाकळ्यातुनी मकरंदी अबोल प्रीत

लडिवाळ रूप सारे मधुर मधुरम
सुमने! गंधाळलेली येती उमलत

मनमनांतरीचे अवीट प्रीतीमिलन
भावशब्दांतुनी, प्रसवते भावगीत

©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र.११४.

२४ – ८ – २०२१.

Author