वेल अक्षरगंधाची

बर्‍याच वेळा आपले अक्षर चांगले नसते आणि एखाद्या परीक्षेत अक्षराला जास्त मार्क असतात आणि तेथे आपण कमी पडतो. चांगले मार्क मिळत नाहीत आणि जे इप्सित साधायचे असते ते साधले जात नाही आणि आपण निराश होतो. सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी सहज होतांना दिसतात. मुख्य म्हणजे देवावर, सदगुरुवर आणि स्वत:वर विश्वास पाहिजे. अक्षर मग ते कोठल्याही भाषेचे, लिपीचे असले तरी ते कसे काढावे, त्याचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे किंवा सराव करावा.



‘अक्षरगंध’ वेलीस लागल्या नाजूक कळ्या,

बघता मोहरल्या अक्षरांच्या टपोऱ्या कळ्या !

टपोऱ्या कळ्यांची झाली अक्षर फुले,

अक्षरांच्या गंधाने आसमंत झुले,

कळ्या विविध अक्षर आणि रंगांच्या ह्या,

सांगू लागल्या गोष्टी एक दुसऱ्यांस त्या !

शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध परिणामकारक मस्त,

सुंदर हस्ताक्षर असे परिपूर्ण व्यक्तिमत्व !

मनामनातील हासरा ‘अक्षरगंध’ करी धुंद,

‘अक्षरगंधी’ वेड मना करी बेधुंद !

ओबडधोबड अक्षर करी मना कष्ट,

‘अक्षरगंध’ सापडता पुरले मनीचे हट्ट !

वेडापिसा झालो, भरल्या आसमंतातील ‘अक्षरगंधा’,

अनुभवले ‘अक्षरगंधा’ तुला मी, घेता मंद सुगंध !

किती उधळास निस्वार्थ, गंध मंदधुंद,

फिटत नाही तुझी ‘अक्षरगंधा’ आस बेधुंद !

स्पर्शली आहेत उषेची कोवळी किरणे मंद,

तोवरी पसरीत जा, तुझा गंध बेधुंद !

‘अक्षरगंधी’ हृदया शास्त्रशुद्ध अक्षरांचा गंध,

उधळी तंत्रशुद्ध, परिणामकारक अक्षरांचा सुगंध !
जगदीश पटवर्धन, वझिरा बोरिवली (प)

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →