विरोधाभास !

झाडे लावा झाडे जगवा असे जनसामान्य म्हणतो. पण एक झाड जीवन देते, वाढविते, पुष्ट करते, पर्यावरणाचे रक्षण करते. तर भ्रष्टाचार रूपी झाड मनाच्या मातीत रुजते आणि मानवाला सैरभैर करून सोडते. या झाडाची फुले व फळे विषारी असतात. वडाच्या झाडाला आलेली फुले व फळे औषधी असतात. याच्या पारंब्या जमिनीत खोल जाऊन झाडाला आधार देतात. तर भ्रष्टाचार रूपी झाडाच्या पारंब्या खोल जाऊन झाडाला पोकळ करतात.



|| हरि ॐ ||

विरोधाभास !

वडाचे झाड कुठेही उगवते !

भ्रष्टाचाराचे झाड मनात उगवते,

वडाच्या वाढीला पाणी नाही लागत,

भ्रष्टाचाराच्या झाडाला पैशाचं पाणी लागत !

वडाचे झाड ‘खता’ विना बहरते,

भ्रष्टाचाराचे झाड ‘खंता’ खात फुलते !

वडाच्या झाडांची पाने जाड मोठी,

भ्रष्टाचाराच्या झाडाची पानेच खोटी !

वडाच्या पारंब्या जातात खोल खोल,

भ्रष्टाचार झाडाच्या पारंब्या तर त्याहून खोल !

वडाची फुले-फळे गोड किती छान,

भ्रष्टाचाराच्या झाडाची फुले-फळे कडूजहर घाण !

वडाचे झाड हवेतील प्रदूषण कमी करते,

भ्रष्टाचाराचे झाड मनातील प्रदुषण वाढविते !

वडाचे झाड मन प्रसन्न ठेवते,

भ्रष्टाचाराचे झाड मन अप्रसन्न करते !

वडाच्या झाडाचा घेर खूप मोठा,

भ्रष्टाचाराच्या झाडाचा मोजता येईना इतका मोठा !

वडाच्या सावलीत झोप छान लागते,

भ्रष्टाचार झाडाच्या सावलीत झोप कायमची जाते !

वडाचे सर्वांग औषधा उपयोगी,

भ्रष्टाचारच्या झाडाचे सर्वांग माणसा विष-प्रयोगी !

<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author