शाळेत असताना बहुतेकांच्या जिवाचा थरकाप उडवणारा ‘अल्जीब्रा’ विषय म्हणजे सोप्या मराठीत बीजगणीत..!!
‘अल्जीब्रा’ हा शब्द आपण इंग्रजी आहे असे समजत असलो तरी तो मुळ अरबी शब्द
‘अल ज़ब्र’ या शब्दावरून तयार झाला आहे. या शब्दाचा अरबी अर्थ ‘तुटलेले भाग जोडणे’ असा आहे. गणितात नाही तरी आपणं दुसरं काय करतो..?
अरबी गणितज्ञ ‘अबु ज़फ्र मुहम्मद इब्न मुसा अल ख्वारीझ्मी’ याने ९ व्या शतकात लिहीलेल्या गणितीसूत्रांवरील ग्रंथास नांव देताना हा शब्द प्रथम वापरला व या ग्रंथाचे नांव होते ‘क़िताब अल-ज़ब्र वल् मुकाबला’ म्हणजे इंग्रजीत ‘Rules of Reintegration and Reduction’.
या पुस्तकाच्या नांवातला पुढचा-मागचा शब्द पुढे काळाच्या ओघात मागे पडले व
‘अल-जब्र’ असा शाॅर्टकट रूढ झाला. पुढे हा शब्द अरबांकडून युरोपीय देशांत गेला व ‘अल्जीब्रा’ असा स्थीर झाला.
अरब लोक खगोलशास्त्र व गणित यात त्या काळातील इतर लोकांच्या मानाने खुप पुढे होते, अपवाद फक्त भारतीयांचा..!
जाता जाता-
अरबी ‘जब्र’ शब्दाचा मराठी उच्चार आपणं ‘जबर’ असा करतो. मराठी जबर म्हणजे समर्थ, मोठा किंवा कठीण! (म्हणूनही कदाचीत गणिताला ‘अल-जब्र’ म्हणत असावेत..!!
जबरदस्त, जबरी, जबरा इ. मराठी शब्दांचा जन्मदाता हा मुळ अरबी शब्द आहे.
आपलं तोंड म्हणजे ‘जबडा’ हा शब्दही बहूदा या शब्दातूनच जन्मला असावा असा माझा अंदाज आहे कारण जबड्यातच ‘जबान’ असते आणि ती ‘जबरदस्त’ही असते नाही का?
-गणेश साळुंखे
९३२१८११०९१