५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे.



५ जून, दिन जागतिक पर्यावरणाचा,

नागरिकांच्या मनातील सुप्त भावनांचा !

शुद्ध पर्यावरणाचा “आनंद” सर्वांच्या मना,

कसे प्रत्यक्षात आणतात हे मात्र कळेना !

पाणी आणि हवा ह्यांचे प्रदूषण आंम्हा ठाऊक,

फोन/मोबाईल/टीव्हीने होते प्रदूषण हे कोणास ठाऊक?

सुजलाम, सुफलाम वसुंधरेची आंम्ही बाळे,

पर्यावरणाशी करितो आंम्ही चाळे !

मग लागतो पाठी आमुच्या प्रदूषणाचा राक्षस,

त्याला चकवा देता देता होतो त्याचे भक्षक !

होत आहे अत्याचार प्रदूषणाचा वसुंधरेवर,

कधी वाटते जावे सगळे सोडून दुरवर !

अत्याचार संपविण्या झाडे लाऊ झाडे जगवू,

पर्यायाने सर्वांचे जीवन उजळू !

देश विकासासाठी आहे गरज विज्ञान-तंत्रज्ञानाची,

म्हणून कोणी विसरत नाही प्रदूषणासी !

प्रदूषणाच्या विळख्याने माणसांचे जीवन होते कष्टी,

हीच आहे सर्व जगावर आपत्ती !

पर्यावरणाचा समतोल ठेवण्या,

आहे गरज प्रदूषण कमी करण्या !

प्रदूषण कमी करण्याचे आहेत मार्ग नामी,

इच्छाशक्ती वाचून काही येत नाही कामी !

जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून,

पाहुणे ठोकतात भाषणे आणि लावतात झाडे !

फोटो काढून झाले, कोण घालणार उद्या पाणी झाडे?

प्रदूषण कमी करण्याचे ध्येय आहे जगाचे,

म्हणून पेलले आहे शिवधनुष्य प्रदूषण कमी करण्याचे !

आहेत आशिष वसुंधरा आणि शिवरामाचा,

लक्षात रोजच असुद्या ५ जून, दिन जागतिक पर्यावरणाचा !!

जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →