“दैनिक प्रत्यक्ष” आमुचे!

दैनिक प्रत्यक्ष हे वृत्तपत्र श्री अनिरुद्ध बापू यांनी सन २००५च्या दत्तजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. हे दैनिक १२ पानांचे असून त्याची किंमत रु.२.५० आहे. दैनिक प्रत्यक्ष सर्व वृत्तपत्रांचे स्टोल तसेच रेल्वे स्टोलवरही उपलब्ध आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या अन्य वृत्तपत्रा प्रमाणे ही मिळते. प्रत्यक्ष दैनिकात परमपूज्य सदगुरु बापू यांनी लिहिलेले अग्रलेख व विविध विषयांवरील इतर लेखकांनी लिहिलेले लेखही वाचकांस वाचावयास मिळतील. पान चार आणि पाचवर आंतरराष्ट्रीय सदरात विविध माहिती आहे जी इतर वृत्तपत्रात अभावानेच वाचायला मिळते.



|| हरि ॐ ||

“दैनिक प्रत्यक्ष”

बिगर राजकीय दैनिक “प्रत्यक्ष” आमुचे,

वाचता – तुटतात वाद, जुळता संवाद सर्वांचे !

बाणाने दाखविली दिशा वाचकांना,

सत्य, प्रेम आणि आनंदाचा मार्ग सर्वांना !

वर्णनातीत उपयुक्त मजकूर भरलेल्या १२ पानांनी,

विविधतेतून एकता सोमवार ते रविवारांनी !

पान पहिले अग्रलेखाचे मानकरी,

जाहिरात छोटी संधी मोठी पाने दुसरी,

देश-विदेशातील विषयांचे जाणकारी !

आणि संमिश्रने होते सुरुवात तिसऱ्या पानाची,

पाने चार आणि पाच आंतरराष्ट्रीय बातम्यांची,

जिगर लागते ती देण्याची,

‘मतलब की बात’ पान सहावर,

विशेष बातम्यांनी होते स्वागत सातवर !

भावनांचा आदर करणारे व्यासपीठ पान आठवर,

ध्यान-दर्शनचित्रं आणि प्रार्थना, अभंग, स्तोत्र पान नऊवर,

“भावागांगेच्या”तीरी लागतात वाचक डोलायला पान दहावर,

समाज प्रबोधनाचे पान अकरा, ग्राम,राज्य,राष्ट्रगंगेच्या तीरावर,

शब्दात दडलेले शब्द कधीमधी लावतात करायला विचार

घरकुल आणि पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांची भेट पान बारावर !

जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author