केस बांधून तुम्ही रात्री झोपता का?

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ?

रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी.....

स्ट्रेट केस असल्यास

तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील. तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.

केस कुरळे असल्यास

तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.

केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ :- मेकअप आर्टीस्ट पायल बालसे

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ?

रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी…..

स्ट्रेट केस असल्यास

तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील. तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.

केस कुरळे असल्यास

तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.

केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ :- मेकअप आर्टीस्ट पायल बालसे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →