खाणं आणि रसिकता म्हटलं, की गुजराती बांधवांची आवर्जून आठवण येते. गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा… आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी असतील, तर आपला स्वत-चा खाद्यपदार्थाचा डबा उघडताच “चाखों ना थेपला न् अथनु (लोणचं)’ असं म्हणून त्यांच्या डब्यातील खाऊ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की. गुजराती जेवणखाण म्हटलं, की सर्वप्रथम सुरत शहराचं नाव आठवतं. गुजराती लोकांमध्ये तर म्हणच आहे, की “सुरतनू जमण (जेवण) अने काशीनो मरण…’
दुधी मुठीया
साहित्य:- दुधी भोपळा १ मध्यम आकाराचा ,गहू पीठ (कणिक)- १ कप,बारीक रवा – १ कप,बेसन- १ कप,आले- २ इंच,हिरव्या मिरच्या – 2,लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पून,तीळ- १/२ टिस्पून,जिरे- १ टिस्पून,धणे पूड -१/२ टिस्पून,हळद – १/२ टिस्पून,हिंग – १/२ टिस्पून,बडीशेप- १/२ टिस्पून,लिंबू रस – २ टिस्पून,साखर- एक चिमूटभर,कोथिंबीर, चिरून- १/२ कप,खायचा सोडा (बेकिंग सोडा) – १/२ टिस्पून,मीठ-चवीप्रमाणे,तेल- २ टीस्पून.
फोडणीसाठी:-तेल- ३ ते ४ टेबलस्पून,कढीपत्ता- २ डहाळ्या,मोहोरी- १ टिस्पून,तिळ – २ टीस्पून,हिंग- १/४ टिस्पून, सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती :- आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.दुधी किसून आणि पिळून घ्या. पण हे दुधीचे पाणी टाकू नका. नंतर कणिक मळण्यासाठी उपयोगी पडेल.दुधी, कांदा, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, सोडा, हिंग, हळद व मीठ परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे.बाजूला काढून ठेवलेले दुधीचे पाणी थोडे थोडे घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या. कणिक फार मऊ नको आणि फार घट्टही नको .
हातावर थोडे तेल लावून कणकेचे ६ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात किंव्हा इतर स्टीमरमध्ये २० ते २५ मिनिटे वाफऊन घ्या. मायक्रोवेव्ह स्टीमर पण वापरू शकता.
थोडे थंड झाल्यावर अर्धा इंच रुंदीचे काप करा. कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी. त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतावे. वरून कोथिंबीर टाकुन सजवावे. नारळाच्या चटणी बरोबर गरम सर्व्ह करा.
तीखा ढोकळा
साहित्य:- -अर्धा कप तांदुळ व पाव कप उडिद डाळ पाण्यात अर्धा तास भिजवुन मिक्सरमधे बारीक वाटुन घ्यावे. अर्धा कप मका पिठ, अर्धा कप जाड रवा /सोजी, ४ टेबलस्पून आंबट दही, १ टी स्पून खाण्याचा सोडा, १/४ टी स्पून हळद, १/४ टी स्पून हिंग, १ टी स्पून साखर, मीठ चवी नुसार, १ टी स्पून लाल तिखट, १ टी स्पून तीळ, १ हिरवी मिरची बारीक चिरलेली, १ टी स्पून तेल, पाणी आवश्यकतेनुसार.
चटणी साठी साहित्यः- २ ते ३ टेबलस्पून डाळे, २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, २ते३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या, १/४ टी स्पून जिरे , १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून हळद, १ टी स्पून लिंबाचा रस, २ टी स्पून दही, अर्धी वाटी पाणी .
कृती. अर्धा तास पाण्यात भिजवुन मिक्सरमधे बारीक वाटलेले डाळ्-तांदुळ , मका पिठ,जाड रवा, दही,हळद,बारीक चिरलेली हिरवी मिरची व लागेल तितके पाणी घलुन सरसरीत पिठ भिजवा .त्यात चवीप्रमाणे मीठ व अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घालुन मिश्रण फेटुन घ्या.१५ मिनिटां करीता झाकुन ठेवा.या वेळेत चटणी साठीचे सर्व जिन्नस एकत्र करुन पातळसर चटणी वाटुन घ्या. आता गॅसवर प्रेशर पॅन मधे भाड भरुन पाणी टाकुन त्यात लहान रिंग/लंगडी ठेवा ..एका लहान ठाळीला तेल लावुन घ्या..
आता एका लहान पातेलीत पाव वाटी पाणी गरम करा.पाणी उकळले कि त्यात उरलेला अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घालुन हे पाणी चमच्याने ढवळुन लगेच ढोकळा मिश्रणात ओता .सर्व मिश्रण छान फेटा.मिश्रण ओतता येईल असे सरसरीत असावे.हे मिश्रण तेल लावलेल्या थाळीत ओता.त्यावर चिमटीने आवडी प्रमाणे लाल तिखट व तीळ पसरवा. थाळी पॅन मधे ठेवा वर प्रेशर पॅन च्या झाकणाची शीटी काढुन झाकण लावा. मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफवा. ढोकळा थाळी बाहेर काढुन त्यावर लगेच १ टी स्पून तेल चमच्याने पसरवा. सुरीने चौकोनी वड्या कापा. या ढोकळ्यावर वरुन फोडणी घालायची नाही त्याऐवजी एक टी स्पून कच्चे तेल थाळीतील तयार वाफवलेल्या ढोकळ्यावर पसरवुन लावायचे आहे.
टिपा. भिजवुन वाटलेल्या डाळ+तांदुळा ऐवजी इडलीचे पिठ किंवा तयार वाटलेले मिश्रण घेतले तरी चालेल. फक्त मका पिठ व+ जाड रवा असे घेतले तरी चालेल. खाण्याच्या सोड्या ऐवजी १ सपाट चमचा इनो वापरला तरी चालेल. हा ढोकळा पातळ वडी सारखा असतो. तसेच मका पिठामुळे मऊ लागतो. भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या,लसुण,शेंगदाणे यांची चटणीही छान लागते..चटणी शिवाय तसाच किंवा सदाबहार टोमॅटो सॉस चालेल.
मेथीचे मुठीया
साहित्य:- १/२ कप मेथीच्या भाजीची पाने, १ कप भाजणी, १ टे स्पून आले-लसूण पेस्ट, ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टी स्पून धने-जिरे पावडर, १/४ टी स्पून हिंग, १ टी स्पून हळद पावडर
१ टी स्पून लाल मिरची पावडर, मीठ, १ टे स्पून गरम तेल (मोहन), १/४ टी स्पून मेथी दाणे
तेल मुठीया तळायला.
कृती:- मेथीची पाने धुवून बारीक चिरून घ्या. मग त्यामध्ये भाजणी आटा, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, धने-जिरे पावडर, हिंग, हळद पावडर, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथी दाणे घालून गरम तेल मिक्स केलेल्या आट्यामध्ये थोडेसे पाणी घालून चांगले मळून घेवून त्याचे एकसारखे २० गोळे बनवा. मग हे गोळे एका चाळणीवर मांडून घ्या. एका मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर मेथीचे गोळे ठेवलेली चाळणी ठेवून चाळणी स्टीलच्या प्लेटने झाकून घ्या ८-१० मिनिट वाफेवर मुठ्ले शिजवून घ्या. एका कढईमधे ठेल गरम करून मेथीचे मुठ्ले छान कुरकुरीत तळून घ्या. गरम गरम मेथी मुठ्ले टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
डाकोर(गुजराती गोटे)
साहित्य:- जाडसर बेसन पिठ २ वाटया, रवा जाडसर १/२ वाटी, धणे व मीरे २-२ चमचे घेवुन जाडसर खरडुन घ्यावे, बडीशोप जाडी २ चमचे, तिखट २ ते ३ चमचे, मीठ चवीप्रमाणे, हळद १ चमचा, जिरे १ चमचा, साखर २ लहान चमचे.
आंबट दही अर्धी वाटी, सोडा पाव चमचा /चुटकीभर, मोहनासाठी गरम कडाकडीत तेल २ मोठे चमचे, भिजवायला गरम पाणी साधारण ३ वाटी,तळण्यासाठी तेल, कोथिंबीर-मिरची-खोबरे व लसुणपात घातलेली पातळसर चटणी..
कृती:-बेसन ,रवा एकत्र करा त्यात दही व तिखट,मीठ,हळद,साखर-धणे-जिरे-मिरे-बडीशोप घालावे..गरम पाणी अगदी थोडे थोडे घालत कालवावे..घट्टसर मिश्रण तयार झाले पाहिजे..आता हे मिश्रण १५ मिनिटे तसेच ठेवावे. पुन्हा एकदा कालवुन पहावे..[रवा घातल्याने कधीकधी मिश्रण जास्त घट्ट होते तेव्हा थोडेसेच चमच्याने पाणी घालावे..तर कधी-कधी मिश्रण सैल ही होते..अशावेळी थोडे रवेदार बेसन अथवा रवा घालावा. कढईत तेल तापायला ठेवावे..यातील २ चमचे तेलाचे मोहन मिश्रणात घालुन ढवळावे व सोडा घालुन पुन्हा ढवळावे.या मोहनाच्या तेलानेही मिश्रण सैल होते..तेव्हा हे लक्षात ठेवुनच पाणी घाला कि मिश्रण घट्टसर च असले पाहिजे. गरम तेलात मध्यम आकाराचे गोलाकार गोटे सोडावे..गॅस कमी करुन अगदी मंद आचेवर हे गोटे गुलवट रंगावर तळावे.तळलेले गोटे कागदावर काढुन जास्तीचे तेल टिपुन घ्यावे.चटणीबरोबर आस्वाद घ्यावा.
टिप:- डाकोरला बटाटेवड्याच्या आकारातील खुसखुशीत गोटे खाल्ले आहेत..मंद आचेवर तळले कि आतुन खुसखुशीत होतात.हे गोटे -प्रत्येकी ३-४ तुकडे करुन वरुन कोथिंबीर्,बारीक चिरलेली थोडीशी चवीपुरती हिरवी मिरची,कांदा ,हिरवी तसेच चिंचे ची चटणी व गोडसर दही व शेव घालुन सर्व्ह करा.
मेथीचे थेपले
साहित्य:-२ वाट्या कणीक, १ मेथीची जुडी, आर्धी कोथिंबीरची जुडी,आले, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा लहान चमचा तिखट, चिमूटभर जिरं, २ मोठे चमचे गूळ, २ मोठे चमचे दही, १ मोठा चमचा तेल, १ लहान चमचा मीठ.
कृती : सर्वप्रथम कणीक चाळून घ्यावी. मेथी व कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरावी. कणकेत तेल, मीठ घालून सारखी करावी. त्यात सर्व मसाला आणि मेथी, कोथिंबीर घालावी. दह्यात गूळ विरघळवून त्यात पीठ घट्ट भिजवाव. गरज वाटली तर पाण्याचा हात लावावा. पेढ्याएवढा गोळा करून पुरीसारखे लाटून तव्यावर टाकून शेकावे. गरमागरम सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
वांग्याची पीठभाजी
साहित्य : वांगी, फोडणीचे साहित्य, तेल, थालीपिठाची भाजणी, धने-जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा-तीळ, तीखट, मीठ, दही, डाळीचे पीठ.कृती : वांग्याचे पातळ काप करावेत व चिरून ते पाण्यात ठेवावे. जरा जास्त तेलात हिंग, मोहरी, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात वांगीकाप घालून अंदाजे मीठ, तिखट, दही, धने-जिरे पावडर चिमूटभर साखर घालून भाजी वाफवून घ्यावी. भाजी शिजली की झाकण काढून त्याला बेसन लावावे व खमंग पीठभाजी तयार करावी. खाली उतरवून गार करावी.
ढेकळी
साहित्य:- एक वाटी ओल्या तुरीचे दाणे, शेतामधून ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात न मिळाल्यास मटारदाणे वापरावेत. दीड वाटी तांदूळपिठी, मीठ, तिखट, चवीला गूळ, आठ-दहा लसूण पाकळ्या, ओल्या पातीचा लसूण मिळाल्यास जरूर वापरावा. तेल, कोथिंबीर.
कृती:-तुरीचे दाणे किंचित वाफवून अर्धवट वाटून घ्यावेत. फार बारीक करू नयेत. लसूण, कोथिंबीर वाटून दाण्यात घालावी. तिखट, मीठ, गूळ, दोन चमचे गरम तेल वाटलेल्या दाण्यात घालावे. दाण्यात तांदूळपिठी घालून भज्याप्रमाणे पीठ तयार करावे. गरम तेलात चमच्याने छोटी-छोटी भजी घालावीत. तांबूस रंगावर भजी तळून काढावीत. नारळ-पुदिना चटणीबरोबर गरम भजी खूप छान लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आजचा विषय गुजराथी पदार्थ भाग दोन.
खाणं आणि रसिकता म्हटलं, की गुजराती बांधवांची आवर्जून आठवण येते. गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा... आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी असतील, तर आपला स्वत-चा खाद्यपदार्थाचा डबा उघडताच "चाखों ना थेपला न् अथनु (लोणचं)' असं म्हणून त्यांच्या डब्यातील खाऊ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की. गुजराती जेवणखाण म्हटलं, की सर्वप्रथम सुरत शहराचं नाव आठवतं. गुजराती लोकांमध्ये तर म्हणच आहे, की "सुरतनू जमण (जेवण) अने काशीनो मरण...'
दुधी मुठीया
साहित्य:- दुधी भोपळा १ मध्यम आकाराचा ,गहू पीठ (कणिक)- १ कप,बारीक रवा - १ कप,बेसन- १ कप,आले- २ इंच,हिरव्या मिरच्या - 2,लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पून,तीळ- १/२ टिस्पून,जिरे- १ टिस्पून,धणे पूड -१/२ टिस्पून,हळद - १/२ टिस्पून,हिंग - १/२ टिस्पून,बडीशेप- १/२ टिस्पून,लिंबू रस - २ टिस्पून,साखर- एक चिमूटभर,कोथिंबीर, चिरून- १/२ कप,खायचा सोडा (बेकिंग सोडा) - १/२ टिस्पून,मीठ-चवीप्रमाणे,तेल- २ टीस्पून.
फोडणीसाठी:-तेल- ३ ते ४ टेबलस्पून,कढीपत्ता- २ डहाळ्या,मोहोरी- १ टिस्पून,तिळ - २ टीस्पून,हिंग- १/४ टिस्पून, सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर.