आजचा विषय बांबू

आजचा विषय बांबू

बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट, खानदेश आणि विदर्भात आढळते. केरळच्या जंगलात बांबू नैसर्गिक वाढवला जातो. त्याची पाने लांबट, टोकाकडे निमुळती आणि खरखरीत असतात. बांबूच्या बियांना वेणुज म्हणतात. कासेट, काष्ठी आणि कळक या नावाने देखील बांबू ओळखला जातो. बांबू ही क्षारमुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. बांबूचे मूळ, पाने, बिया औषधात वापरतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी बांबूची भाजी उपयुक्त असते. बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. या भाजीमुळे भूक आणि पचनशक्ती वाढते. बांबू पिकला की खोडाच्या पेरात एक स्राव जमा होऊ लागतो. त्यास वंशलोचन म्हणतात. 'वंशलोचन' हे दम्यावरील उत्तम औषध आहे. बांबूच्या मुळांचा रस स्थूलता आणि मधुमेह या विकारांवर रामबाण उपाय मानला जातो. आज जगात सर्वात चांगल्या प्रतीचे बांबू उत्पादन करणारा देश म्हणजे चीन.
कोवळ्या बांबूच्या कोंबाला कोकणात चिवलाचे कोंब असे म्हणतात. पावसात नवीन बांबू रुजून वर येतात. त्या वेळी ते कोवळे असतात. त्या वेळीच हे बांबूचे कोंब खाण्यासाठी सर्वार्थाने वापरले जातात. भारतात उत्तर-पूर्वेकडील राज्यांत राहणारे लोक बांबूच्या या लुसलुशीत व कोवळ्या ‘शूट्स’ना(कोंब) आपला मुख्य आहार मानतात. पातळ कढण (सूप), लोणचे, भाजी करण्यासाठी ते योग्य असतात. या भाजीत क्षारांचं प्रमाण भरपूर असतं.
इडिअप्पम्, अप्पम् बरोबरच केरळमध्ये त्यांची खरी पसंती असलेला पुट्ट हा पदार्थ. पुट्ट हा प्रकार तांदळाचं पीठ आणि खोवलेला नारळ ह्यांच्या मिश्रणापासून बनवतात. हे मिश्रण बांबूच्या नळकांडय़ात किंवा नळकांडय़ांसारख्या तयार मिळणा-या साच्यात घालून वाफवतात. हल्ली काही हॉटेल मध्ये बांबू मध्ये शिजवलेले बिर्याणी सारखा प्रकार मिळू लागला आहे.
कोवळ्या बांबूची भाजी प्रकार एक
साहित्य. २ वाटय़ा कोवळा बांबू साफ करून चिरलेला, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १वाटी बारीक चिरलेला कांदा, १ वाटी ओला नारळ किसून, २ चमचे आले-लसूण वाटलेले, २ पळ्या तेल, २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, १ चमचा धनेजिरे पूड, १ चमचा गरम मसाला पावडर, २/३ आमसुले, मीठ चवीप्रमाणे.
कृती. पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर वाटलेले आले, लसूण आणि कांदा घालून गुलाबी परतून घ्या. नंतर टोमॅटो घाला व परता. सगळे कोरडे मसाले घालून परतून घ्या. त्यावर ओला नारळ आणि बांबूचे काप घालून परतून घ्या. मीठ घाला, दीड कप पाणी घाला. झाकण ठेवून शिजवून घ्या. शिजत आल्यावर आमसुले घाला व ५ मिनिटे शिजू द्या. एक वेगळी आणि पौष्टिक भाजी तयार.
कोवळ्या बांबूची भाजी प्रकार दोन.
कोंब सोलून त्यावरील टणक आवरण काढून टाकावी लागतात. आतला, आपली नखं खुपसता येईल असा कोवळा भाग काढून घेऊन तो धुवावा व मिठाच्या पाण्यात बारीक चिरून ठेवावा. त्याला असणारा उग्र वास त्यामुळे कमी होतो व तो मऊदेखील होतो. तेव्हा आदल्या रात्री कोंब चिरून ठेवून दुसऱ्या दिवशी भाजी करावी.
साहित्य. वर सांगितल्या प्रमाणे चिरलेला कोंब, कांदा, चण्याची डाळ, लाल तिखट पूड, ओले खोबरे, हळद, मीठ, मोहरी, हिंग, तेल.
कृती. भांडय़ात तेल तापवून मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. त्यावर कांदा टाकून परतावा. त्यात मग शिजवलेली डाळ व चिरलेला कोंब घालून भाजी पाण्यात शिजवावी. भाजी चांगली शिजल्यावर हळद, लाल तिखट, मीठ व ओले खोबरे घालून भाजी सुकी बनवावी. पातळ भाजी करायची असेल तर खोबरे बारीक वाटून घालावे.
(टीप. चिरलेला कोंब कुकरमध्ये तीन ते चार शिट्टय़ा काढून शिजवून घ्यावा व मग डाळीवर परतावा.)
* कोवळ्या बांबुचे लोणचे*
बांबुला जे पावसाळ्यात कोवळे कोंब येतात त्याच्या गाभ्याच्या चकत्या करुन पाण्यात भिजवून ठेवतात वर्षे भर राहण्यासाठी मीठाच्या पाण्यात घालुन ठेवतात व मग त्याचे लोणचे घालतात.
साहित्य. दोन वाट्या बांबुच्या चकत्या, चार लिंबु, दहा बारा बारीक चिरलेल्या मिरच्या, वाटीभर आल्याच्या चकत्या, १०० ग्राम मोहरीची डाळ व १०० ग्रॅम मेथी, एकवाटी मीठ व पाव लीटर तेल, दोन चमचे हिंग व चमचाभर हळद.
कृती. प्रथम बांबुची चकती, आले, मिरची, व लिंबु मीठ लावुन दोन तास ठेवावे व दोन तासाने चाळणीत ठेवुन पाणी काढून टाकावे, एका भांड्यात तेल करम करुन त्यात मोहरीची डाळ मेथी व हिंग व हळद घालुन परतुन घ्यावे व थंड झाल्यावर त्या मध्ये वरील मिश्रण घालावे व मिक्स करुन दोन तासा नतंर बरणीत भरावे आठ दिवसाने मुरल्यावर खाण्यास तयार होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट, खानदेश आणि विदर्भात आढळते. केरळच्या जंगलात बांबू नैसर्गिक वाढवला जातो. त्याची पाने लांबट, टोकाकडे निमुळती आणि खरखरीत असतात. बांबूच्या बियांना वेणुज म्हणतात. कासेट, काष्ठी आणि कळक या नावाने देखील बांबू ओळखला जातो. बांबू ही क्षारमुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. बांबूचे मूळ, पाने, बिया औषधात वापरतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी बांबूची भाजी उपयुक्त असते. बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. या भाजीमुळे भूक आणि पचनशक्ती वाढते. बांबू पिकला की खोडाच्या पेरात एक स्राव जमा होऊ लागतो. त्यास वंशलोचन म्हणतात. ‘वंशलोचन’ हे दम्यावरील उत्तम औषध आहे. बांबूच्या मुळांचा रस स्थूलता आणि मधुमेह या विकारांवर रामबाण उपाय मानला जातो. आज जगात सर्वात चांगल्या प्रतीचे बांबू उत्पादन करणारा देश म्हणजे चीन.

Author