आजचा विषय बीट

आजचा विषय बीट

बीट हे कंदमूळ या प्रकारात मोडते. हे कच्चे किंवा शिजवूनही खाल्लं जातं. जीवनसत्त्व आणि खनिजांचा यात भरपूर प्रमाणात साठा असतो. आपल्याकडे लाल रंगांचं बीटच प्रसिद्ध आहे. मात्र पिवळा, पांढरा आणि रेषारेषांच्या बीटचीदेखील लागवड होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. बेटासायनिन मुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. चवीला काहीसं गोड असतं. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह, अ, बी ६ आणि क जीवनसत्त्व असतं. याचबरोबर फॉलिक अॅसिड, काबरेहायड्रेट्स, प्रथिन आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं. बीटाच्या सेवनाने रक्ताभिसरण अतिशय उत्तम होतं. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. धमन्यांचं अरोग्य सुधारतं. त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण कमी होतं. मधुमेह झालेल्या लोकांनीही बीटाचं सेवन करावं. दररोज बिटाचा ज्युस प्यायल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे वृद्धांमध्ये आढळून येणारा डिमेन्शिया काही प्रमाणात कमी होतो. यात फायबरचं प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनीदेखील याचं सेवन करावं म्हणजे हा त्रास कमी होतो. यात भरपूर प्रमाणात पोषणमूल्य असल्याने झोप येणे, स्नायूंची हालचाल, शिकणे किंवा लक्षात ठेवणे आदी गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त आहे. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीट रोज खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. बीटमधील फॉलिक अॅतसिड गर्भवती महिला आणि गर्भातील बाळासाठी फायदेशीर असतं. मासिक पाळी नियमित येत नसेल, तर बीट खा. दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या समस्या होणार नाही.
बीटाचे काही पदार्थ.
बीटाच्या पु-या
साहित्य. बीट, गव्हाचे पीठ, मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, तेल.
कृती. गव्हाच्या पिठात हळद, मिरचीची पेस्ट, मीठ, किसलेले बीट टाकून पीठ भिजवा. छोटय़ा आकाराचे गोळे करून पु-या लाटून घ्या. तेल गरम करून मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्या. गरमागरम सव्‍‌र्ह करा.
बीट चीज बॉल्स
साहित्य. दोन ते तीन बीट, एक वाटी किसलेलं चीज, दोन उकडून घोटून घेतलेली रताळी, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या, एक चमचा तिखट, एक चमचा मिरपूड, एक चमचा किसलेलं आलं, दोन चमचा मैदा, एक वाटी ब्रेड क्रम्स, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती. प्रथम बीट किसून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये किसलेलं बीट, किसलेलं चीज, उकडून घोटून घेतलेली रताळी, बारीक चिरलेल्या मिरच्या, तिखट, मिरपूड, आलं, मैदा आणि चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्या. नंतर या मिश्रणाचे छोटे-छोटे बॉल्स करून घ्या. तयार बॉल्स ब्रेड क्रम्समध्ये घोळून तळून घ्या. तयार बीट चीज बॉल्स टोमॅटो सॉस सोबत सव्‍‌र्ह करा.
बिटाची भाजी.
साहित्य. २ मध्यम आकाराचे उकडलेले बीट, १ मोठा चमचा तेल, १/४ चमचा जिरे, १/८ चमचा हिंग, १/८ चमचा हळद, २ हिरव्या मिरच्या, २ ते ३ चमचे ओला बारीक किसलेला नारळ, २ चमचे भरडसर शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मीठ, थोडीशी साखर, अध्र्या लिंबाचा रस, सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती. उकडलेलं बीट सोलून बारीक चिरून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यात फोडणीसाठी जिरे, हिंग, हळद आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. त्यात चिरलेलं बीट आणि मीठ घालावं. बारीक किसलेला नारळ घालून झाकण ठेवावं. मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी. त्यानंतर शेंगदाणा कूट आणि चवीपुरती साखर घालून २ मिनिटे ढवळावं. लिंबाचा रस घालून सजावटीसाठी कोथिंबीर मिक्स करावी. चपाती आणि डाळ-भाताबरोबर गरम भाजी वाढावी. बिटाऐवजी भोपळा घातल्यास, भोपळ्याची भाजी ही सुंदर लागते. अशा प्रकारे ही २ ते ३ जणांची वाढणी अगदी १५ मिनिटांत तयार होते.
बीटाची बर्फी.
साहित्य. २ वाट्या बीटचा कीस, दीड वाटी साखर, १ वाटी दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर, ३ चमचा ड्रिकींग चॉकलेट
कृती. प्रथम बीटचा कीस शिजवावा. नंतर दूधाची पावडर, ड्रिकींग चॉकलेट व साखर एकत्र करून घ्या व बीटच्या किसात घालून शिजवा.
मिश्रण घट्ट होई पर्यंत गरम होऊ द्या. आता हे चांगल्या प्रकारे घोटुन घ्या. नंतर थोडीशी पिठीसाखर घालून घोटा व तूप लावलेल्या ताटात थापा व वड्या पाडा. आता आपल्या आवडी प्रमाणे सजवा आणि सर्व करा.
बिटाची वडी.
साहित्य. दोन बिटांचा कीस, एक वाटी नारळचव, दीड वाटी साखर, वेलदोडे पूड, तूप, काजू, बदाम.
कृती. बीट उकडून साल काढून किसावा. बिटाचा कीस, नारळाचा चव, साखर, एक वाटी दूध एकत्र करून शिजत ठेवावे. सारखे हलवावे. म्हणजे खाली लागणार नाही. मिश्रण घट्ट झाले, की वेलदोडे पूड घालावी. ताटाला तूप लावून घट्ट मिश्रण ताटात जाडसर थापावे. वरून काजू-बदाम काप दाबून बसवावेत. थोडे थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापाव्यात.
बिटाचा पराठा
साहित्य. मध्यम आकाराचे १ बीट, चमचाभर तीळ, तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून), बारीक चिरून कोथिंबीर, अर्धीपळी कच्चे तेल, थोडे पाणी, चिमुटभर साखर, चवीप्रमाणे मिठ, हळद, हिंग.
कृती. बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या. थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा. पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.
बीटाची कोशिंबीर
साहित्य. बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ.
कृती. सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घ्या. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घाला. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घ्या.
बीटाचे मोदक
साहित्य. सारणासाठी. ओलं खोबरं, एक कप बिटाची प्युरी, साखर, वेलची.
पारीसाठी. सव्वा कप पाणी, एक कप तांदळाचं पीठ, एक चमचा मीठ, गूळ.
कृती. अर्धा कप पाण्यात चिमूटभर मीठ घालून पाणी चांगलं उकळा. त्यात तांदळाचं पीठ घालून मिश्रण चांगलं ढवळा. पॅन गरम करा. त्यात खोबरं, बिटाची पेस्ट, साखर, वेलची घालून व्यवस्थित मिक्स करा. सर्व व्यवस्थित एकत्र केलं की त्यात गूळ घालून, मेल्ट करून थंड करायला ठेवा. आता त्या पिठाचे लहान लहान गोळे करून घ्या. हे वरील मिश्रण त्या गोळ्यांमध्ये घाला. त्याला मोदकाचा आकार देऊन उकडून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author