आजचा विषय राजगिरा

आजचा विषय राजगिरा

राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कबरेदकं आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या. नाजूक कोठा असणाऱ्यांनी तसेच वयस्कर लोकांनी उपवासामध्ये राजगिरा लाही आणि दूध किंवा राजगिऱ्याचा लाडू घ्यावा. एका राजगिरा लाडूत केवळ ३० उष्मांक असतात. स्थूल व्यक्तींनी उपवासाला राजगिरा घ्यायला हरकत नाही. आयुर्वेदानुसार राजगिरा हे पित्तप्रकृतीसाठी वरदानच आहे. उलट्या, आम्लपित्त, अल्सर, कावीळ या विकारांमध्ये राजगिरा पथ्यकारक आहे. यामध्ये दुधातील कॅल्श‌यिमपक्षा दुप्पट प्रमाणात कॅल्श‌यिम असते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंटस, व्हिटॅमीन सी व ई, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असते. इतर तृणधान्याच्या तुलनेत राजगिऱ्यात खूप मोठ्या प्रमाणावर प्रथ‌निे, खासकरून लायसिन अमिनो अॅसिड असते. वजन कमी करण्यात याची मदत होते. मधुमेहींना रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी राजगिरा मदत करतो.
राजगिऱ्याचे काही पदार्थ
राजगिऱ्याची चिक्की
साहित्य. दोन कप राजगिरा, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे (थोडे जाडसर भरडून), दोन चमचे रिफाइंड तेल, एक कप गूळ.
कृती. तेल व गूळ एकत्र करून कढईत वितळून घ्यावे. त्यात राजगिरा, शेंगदाणे मिसळून मिश्रण एकजीव करावे. त्याचा गोळा बनवावा. मिश्रण ट्रेमध्ये थापून त्याच्या वड्या कापाव्यात.
राजगिरा कचोरी
साहित्य. पाव किलो राजगिरा पीठ, ४ बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, जिरा, तिखट, मीठ.
कृती. सर्वप्रथम बटाटे उकळून घ्या. हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्या.बटाटा सोलून, मिरची कोथिंबीर पेस्ट, शेंगदाणा कूट, मीठ, तिखट सर्व एकत्र करून त्यात राजगिरा पीठ मिसळावे. सर्व पदार्थ मिसळताना थोडे पाण्याचे साह्य़ घेऊन घट्ट पीठ तयार करा. छोटे-छोटे गोळे करून कचोरीच्या आकाराचे हातावर थापून घ्या. उकळत्या तेलात खुसखुशीत तळून घ्या.
राजगिरा पिठाची उकड
साहित्य. १ वाटी राजगिरा पीठ, दीड वाटी ताक, एखादी हिरवी मिरची, एक चमचा आल्याचा कीस, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीला मीठ, फोडणीसाठी एक मोठा चमचा तूप, १ चमचा जिरं, कोथिंबीर.
कृती. तुपाची जिरं घालून फोडणी करावी, त्यात मिरच्यांचे तुकडे परतावेत, आलं घालावं, ताकात पीठ आणि मीठ मिसळून फोडणीत ओतावं आणि ढवळत राहावं, पीठ शिजलं की खाली उतरून दाण्याचं कूट आणि कोथिंबीर मिसळावी.
राजगिरा डोसा
साहित्य : राजगिरा पीठ १ कप, बटाटे (किसलेले) ३ मध्यम, हिरव्या मिरच्यांची पेस्ट १ चमचा, कापलेली कोथिंबीर १ चमचा, जिरे १ चमचा, तेल १ चमचा, मिठ पाणी – गरजेप्रमाणे
कृती : हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि एका भांडय़ात राजगिरा पीठ, जिरे, मिठ टाका आणि एकत्र करा. गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणी घाला. तवा गरम करा आणि मिश्रणाने डोसा घाला. कडेने थोडे तेल सोडा आणि कडा लालसर होईपर्यंत राहू द्या. त्यानंतर डोसा उलटा आणि दुसऱ्या बाजूने शिजू द्या. नारळाच्या चटणी बरोबर सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author